Photo Credit- X

CBSE Board Exams 2025 Admit Card: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन कडून दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेसाठी Pariksha Sangam Portal वर त्यांच्याकडून अ‍ॅडमीड कार्ड जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ही अ‍ॅडमीट कार्ड्स (Admit Cards) त्यांच्या शाळांकडून दिली जाणार आहेत. केवळ शाळा प्रशासनाला या अ‍ॅडमीट कार्डस क्या लिंक देण्यात आल्या आहेत. यामध्ये cbse.gov.in वर क्लिक करून लॉगिन केल्यास ती अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येणार आहेत.

सीबीएससी च्या बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा 18 मार्च पर्यंत तर 12 वीच्या परीक्षा 4 एप्रिल पर्यंत होणार आहेत. सकाळी 10.30 पासून परीक्षा सुरू होणार असून त्या एकाच शिफ्ट मध्ये होणार आहेत.

यंदाच्या वर्षी 8 हजार शाळांमध्ये सुमारे 44 लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. यामध्ये भारतात आणि भारता बाहेरून विद्यार्थी सीबीएससी ची बोर्ड परीक्षा देतील. CBSE Introduces CCTV Policy in Board Exams 2025: आगामी बोर्ड परीक्षांसाठी सीबीएसईचे सीसीटीव्ही धोरण जाहीर; शाळेच्या आवारात बसवण्यात येणार कॅमेरे .

CBSE Board Exams 2025 अ‍ॅडमीट कार्ड कसे कराल डाऊनलोड?

  • cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
  • होम पेजवर दिलेल्या अ‍ॅडमीट कार्ड्स लिंकवर क्लिक करा
  • युजर आयडी, पासवर्ड टाका
  • अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करा
  • आता तुमच्या अ‍ॅडमीट कार्ड्सची प्रिंट काढा.

हॉल तिकीट्स डाऊनलोड करण्यासाठी इथे करा क्लिक.

सीबीएसईने यंदा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रियेत वाढ करण्यासाठी अनेक बदल लागू केले आहेत. मुख्य बदलांपैकी एक म्हणजे लहान आणि दीर्घ उत्तरांच्या प्रश्नांमध्ये घट आहे. ज्याचा उद्देश विश्लेषणात्मक आणि गंभीर विचारांवर अधिक जोर देणे आहे.

बोर्डाने अलीकडेच परीक्षेच्या नैतिकतेबद्दल एक अधिसूचना जारी केली आहे ज्यात ड्रेस कोड, परीक्षा हॉलमध्ये परवानगी असलेल्या आणि बंदी असलेल्या वस्तू,  आणि दंड या बद्दल माहिती दिली आहे.