CA November Exam Date 2020: ICAI ने जारी केलं वेळापत्रक, दिवाळी सोबत पार पडणार परीक्षा icai.org वर पहा संपूर्ण Date Sheet
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

ICAI कडून यंदाच्या भारतामधील CA November Exam 2020 चं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. दरम्यान icai.org या अधिकृत संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा देशात सीए ची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीमध्ये पार पडणार आहेत. ICAI ने दिलेल्या माहितीनुसार 1 ते 18 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा होणार आहे. 14 नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. टाईम टेबल मध्ये फाऊंडेशन कोर्स, इंटरमिजिएट (old & new)आणि फायनल कोर्स एक्झाम यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एकाच शिफ्टमध्ये 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा होईल. फाऊंडेशन पेपर 3 आणि 4 हे दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार आहेत.  इथे पहा संपूर्ण वेळापत्रक.

भारतामध्ये सीए परीक्षा 207 शहरांमध्ये घेतल्या जातात तर परदेशामध्ये 5 शहरात होतात. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 5 ऑगस्ट पासून सुरूवात होणार आहे तर 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. विद्यार्थी त्यांची परीक्षा फी ऑनलाईन भरू शकतात. दरम्यान 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू न शकणार्‍या विद्यार्थ्यांकडून लेट फी घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ICAI च्या अधिकृत संकतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान मे सायकलच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 29 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. परंतू कोविड 19 संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयामध्ये ICAI ने दिलेल्या माहितीनुसार परीक्षा नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलली जाईल असं म्हटलं होतं.