CA May Exams 2024 Revised Schedule: ICAI कडून CA च्या मे महिन्यातील परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहे. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान देशात लोकसभा, काही राज्यां विधानसभा निवडणूका असल्याने परीक्षा आणि निवडणूका एकत्र आल्याने वेळापत्रकामध्ये बदल झाले आहेत. नव्याने लवकरच वेळापत्रक icai.org या अधिकृत संकेतस्थळावर दिले जाणार आहे. ICAI च्या जारी नोटीस मध्ये 19 मार्चला नवं वेळापत्रक संध्याकाळपर्यंत अपलोड केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
सीए ची परीक्षा यापूर्वी जारी वेळापत्रकानुसार, जून 20,22,24 आणि 26 दिवशी फाऊंडेशन कोर्स साठी आणि इंटरमेजिएट ग्रुप 1 परीक्षा मे महिन्यात 3,5,7 आणि ग्रुप 2 ची मे 9,11 आणि 13 दिवशी होणार होती. अंतिम परीक्षा मे महिन्यात 2,4,6 तारखेला ग्रुप 1 साठी आणि 8,10,12 तारखेला ग्रुप 2 साठी होणार होती परंतू निवडणूकांमुळे या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येतील अशी शक्यता आहे. सध्या या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
ICAI CA May Exam 2024 चं वेळापत्रक कसं पहाल?
- अधिकृत वेबसाईट icai.org ला भेट द्या.
- CA May exam revised schedule PDF च्या लिंक वर क्लिक करा.
- आता CA May exam revised schedule PDF तुम्ही डाऊनलोड करू शकाल.
- वेळापत्रक डाऊनलोड करून सेव्ह करून ठेवू शकाल.
लोकसभेच्या निवडणूका 7 टप्प्यांत देशभर होणार आहेत. 4 जून दिवशी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकांचा महाराष्ट्रातील ट्प्पा 5 दिवसांचा आहे. Main आणि PQC exams साठी तसेच फाऊंडेशन परीक्षा साठी रजिस्ट्रेशन फॉर्म 2 ते 23 फेब्रुवारी दरम्यान खुले करण्यात आले होते.