Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Institute of Chartered Accountants of India कडून आज (5 जुलै) CA Final and Inter final exam results 2023 जाहीर केला जाणार आहे. मे महिन्यात पार पडलेल्या या परीक्षांचा निकाल आज जाहीर होत आहे. अधिकृत वेबसाईट icai.nic.in वर निकाल विद्यार्थी पाहू शकणार आहेत. ICAI ने निकालाबाबत अपडेट्स अधिकृत ट्वीटर अकाऊंटद्वारा दिली आहे.

CA Final (Group 1) ची परीक्षा 2 ते 9 मे दरम्यान झाली आहे. तर Final (Group 2)ची परीक्षा मे महिन्यात 11-17 दरम्यान झाली आहे. तर CA Intermediate (Group 1) ची परीक्षा 3 मे ते 10 मे दरम्यान झाली आहे. Inter (Group 2)ची परीक्षा 12 ते 18 मे दरम्यान झाली आहे. नक्की वाचा: MU IDOL Admission 2023: मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल मधील प्रवेश प्रक्रियेला 15 जुलै पर्यंत मुदतवाढ .

पहा ट्वीट

CA Final, Inter May Results 2023 चा निकाल कसा पहाल?

  • अधिकृत वेबसाईट icai.nic.in ला भेट द्या.
  • होमपेजवर CA Inter किंवा CA Final Results 2023 च्या लिंकवर क्लिक करा.
  • आता नवं पेज ओपन होईल. त्यावर लॉगिन करण्यासाठी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाका.
  • ICAI CA Results 2023 आता तुमच्या स्क्रिनवर दिसणार आहे.
  • हा निकाल डाऊन करून त्याची प्रिंट आऊट देखील काढता येऊ शकते.

गेल्या वर्षी, रंजन काबरा 666 गुणांसह (83.25%) सीए इंटरमिजिएट निकाल 2022 मध्ये अव्वल ठरला होता. तर, मीत अनिल शहा याने CA अंतिम निकाल 2022 मध्ये रँक 1 मिळवला. त्याला एकूण 642 गुण मिळाले होते.