Bank (Photo Credit: PTI)

देशामध्ये अनेक क्षेत्रात सध्या नोकरकपात झाली असून असे असेल तरी बँकिंग क्षेत्रात (Banking sector) मोठ्या प्रमाणावर नोकर भर्ती ही सुरुच आहे. व्यवसायात वाढ झाल्यामुळे केवळ सरकारीच नाही तर खासगी बँकांनीही (Private Bank) नोकऱ्या दिल्या आहेत. हाच ट्रेंड भविष्यातही दिसेल कारण बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा, आरबीआयची (RBI) धोरणं आणि डिजिटलायझेशन यामुळं बँकांचा व्यवसाय अधिक वेगाने वाढण्याची शक्यता असल्यामुळे यामुळे नोकरीची संधी देखील उपलब्ध होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकांनी सुमारे 1.23 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. गेल्या 10 वर्षांतील या विक्रमी नोकऱ्या आहेत. (हेही वाचा - Maruti Suzuki to Hike Prices: नवीन वर्षात कार खरेदी करणाऱ्यांना झटका; जानेवारीपासून मारुती सुझुकीच्या गाड्या होणार महाग)

सध्या खासगी बँकाही राष्ट्रीय बँकासारखेच आपला व्यवसाय वाढवत असून आता टियर-3 आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळं नवीन नोकऱ्या देण्यात खासगी बँका देखील आघाडीवर आहेत. त्यांनी ग्राहक सुविधा, कर्ज, विमा आणि तंत्रज्ञान विभागात जास्तीत जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. खासगी क्षेत्रातील HDFC बँक, ICICI बँक, Axis बँक, कोटक महिंद्रा बँक, IndusInd बँक, IDFC फर्स्ट बँक, बंधन बँक आणि AU बँक यांनी 2023 यांनी गेल्या आर्थिक वर्षात आपला विस्तार हा केला असून यामुळे याबँकामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या या उपलब्ध झाल्या आहेत.  आर्थिक वर्ष 2011 मध्ये बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. मात्र 2023 या आर्थिक वर्षात सर्वाधिक नोकऱ्या या देण्यात आल्यात.