Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी, इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या येथे अधिक
Bank of Baroda | File Image

सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कारण बँक ऑफ इंडियाने रुरल अॅन्ड एग्री-बँकिंग विभाग आणि वेल्थ मॅनेजमेंट सर्विस विभागात एकूण 105 पदांवर घोषणा केल्यानंतर एकूण 198 पदांवर ही नोकर भरती केली जाणार आहे. बँकेद्वारे 12 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, कॅश मॅनेजमेंटमध्ये 53 पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. तर रिसिवेबल्स मॅनेजमेंट मध्य 145 पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. बँक ऑफ बडोदा द्वारे आधी जाहीर केलेल्या अर्जाची प्रक्रिया 27 जानेवारी 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. तर अन्य नोकर भरतीसाठी 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

बँक ऑफ बडोदाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या रिसिवेबल्स मॅनेजमेंटमध्ये 145 पदांवर भरतीच्या जाहीरातीच्या माध्यमातून जे अर्ज करणार आहेत त्यामध्ये एरिया रिसिवेबल्स मॅनेजरच्या 50 पद, रीजनल रिसिवेबल्स मॅनेजर 48 पद, झोनल रिसिवेबल्स मॅनेजर 21 पद आणि अन्य पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in येथे भेट द्यावी. यासाठी 1 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे.(PAN-Aadhaar Linking Deadline: पॅन-आधार जोडणी 31 मार्च पर्यंत करा अन्यथा 'या' आर्थिक दंडाला जावं लागेल सामोरे!)

बँकेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मॅनेजमेंटमध्ये 53 पदांवर भरतीसाठी नव्या जाहिरातीच्या माध्यमातून ज्या पदांवर अर्ज करायचा आहे त्यामध्ये असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट- एक्विजिशनच्या 50 पद आणि असिस्टंट वाइस प्रेसीडेंट- प्रोडक्ट मॅनेजरच्या 3 पदांवर निवड केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.