अमृतसर येथील Hissaa ने रचला इतिहास; International Space Olympiad 2020 मध्ये पटकावले प्रथम स्थान; NASA कडून भेटीसाठी आमंत्रण
NASA (Photo credits: PTI)

पंजाब (Punjab) मधील अमृतसर (Amritsar) येथील एका 16 वर्षीय विद्यार्थीनीला नॅशनल एरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration) तर्फे अमेरिकेतील (US) जॉन एफ केनेडी स्पेस सेंटर (John F Kennedy Space Centre) ला भेट देण्याचे आमंत्रण मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या इंटरनॅशल स्पेस ऑलिम्पियाड 2020 (International Space Olympiad 2020) मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे या विद्यार्थीनीला नासातर्फे आमंत्रित करण्यात आले आहे. हिस्सा सवराजिंदर पाल सिंह (Hissaa Savrajinder Pal Singh) असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. या ऑलिम्पियाडमधील प्रिलिमीनरी, इंटरमीडिएट आणि फायनल टेस्टमध्ये हिस्साने सर्वाधिक 78.75 मार्क्स मिळवले.

सिनियर कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी हिस्सा ही पहिली भारतीय विद्यार्थीनी आहे. हिस्सा अमृतसर मधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये 10 वीच्या वर्गात शिकत आहे. विशेष म्हणजे इंटरनॅशल स्पेस ऑलिम्पियाड 2020 जिंकण्यासाठी हिस्साने कोणताही कोचिंग क्लास लावला नव्हता. स्वतः तयारी करुन तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हिस्साला खगोलशास्त्रज्ञ व्हायचे आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हिस्साने सांगितले की, "इंटरनॅशल स्पेस ऑलिम्पियाड 2020 प्रथम क्रमांक पटकावल्याचे अधिकृतपणे समजले तेव्हा मला स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला."

इंटरनॅशल स्पेस ऑलिम्पियाड 2020 मध्ये सिंगापूर, स्वित्झर्लंड आणि भारतातील विविध ठिकाणांहून विद्यार्थी सहभागी झाले होते. "मी सप्टेंबर 2019 मध्ये ऑलिम्पियाड 2020 झाली रजिस्ट्रेशन केले होते. परंतु, कोविड-19 संकटामुळे परीक्षेची पहिली फेरी जानेवारीमध्ये घेण्यात आली. तर दुसरी फेरी जून आणि तिसरी फेरी ऑगस्टमध्ये झाली. तसंच बाहेरील परिस्थिती सुरळीत होण्याची मी वाट पाहत आहे. त्यानंतर माझे नासाला जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल," असेही तिने सांगितले.

आपल्या यशाचे श्रेय ती तिच्या आई-वडीलांना देते. तिचे वडील सवराजिंदर पाल सिंग हे अमृतसर येथे इंजिनियर आहेत. तर आई कमलप्रीत कौर, सरकारी शाळेत इंग्रजीची शिक्षका आहे. ती म्हणते की, "माझ्या वडीलांनी मला विज्ञानातील बारकावे शिकवले तर आईकडून मी खगोलशास्त्राच्या बेसिक गोष्टी शिकले."