11th Online Admission Rescheduled Due To Maratha Reservation (Photo Credits: File Image)

मराठा आरक्षणाच्या  (Maratha Reservation) बहुचर्चित खटल्यावरी कोर्टाने 12 ते 13%आरक्षण मान्य करून अलीकडेच निर्णय सुनावला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी ही यंदाच्या अकरावी प्रवेश (11th Online Admission) प्रक्रियेतही लागू होणार आहे. त्यानुसार अगोदरच सुरु झालेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. खुल्या वर्गातून ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल  विद्यार्थ्यांना पुन्हा SEBC आणि EWS प्रवर्गामधून अर्ज करण्याची संधी देण्यासाठी वेळापत्रक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थी 4 जुलै पर्यंत अर्ज भरू शकणार आहेत, तर पहिल्या गुणवता यादीची तारीख ही 12 जुलै करण्यात आली आहे. त्याआधी 5 जुलै ला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

19 जून ते 4  जुलै- बायफोकल, कला, वाणिज्य आणि विज्ञान प्रवेशासाठी अर्ज, पसंतीक्रम भरणे, कॉलेजांनी कोट्यातील प्रवेश पूर्ण करणे.

5  जुलै 2019 (संध्याकाळी 7  वाजता) - सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल

6- 8  जुलै 2019 (सकाळी 11 ते सायंकाळी 5) -अर्जाची पुनर्तपासणी करणे आणि हरकती निवारण करता येणार . 11th Admission 2019: ICSE विद्यार्थ्यांचे केवळ पहिल्या 5 विषयांचे गुण ग्राह्य धरणार; नवं परिपत्रक जाहीर

पहिली फेरी

12 जुलै 2019 ( संध्याकाळी 6 वाजता) -पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार

13 जुलै व 15 जुलै 2019 (सकाळी 11 ते सायंकाळी 5)- पहिल्या गुणवत्ता यादीतले विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणार

16जुलै 2019 (सकाळी 11 ते दुपारी 3 ) -पहिल्या गुणवत्ता यादीतले विद्यार्थ्यांचे प्रवेश

16 जुलै, 2019-(7 वाजता)- शिल्लक जागांचा आढावा घेतला जाणार .

17 ते १८जुलै, 2019 - (सकाळी 11 ते 5 पर्यंत) अर्जाचा भाग - 1 आणि भाग 2 भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध.

हे ही वाचा- FYJC Admissions 2019: 11 वी प्रवेशप्रक्रिया सुरू; mumbai.11thadmission.net वर कशी पहाल Provisional आणि General Merit List 2019

दुसरी फेरी

22 जुलै 2019 ( संध्याकाळी 6  वाजता) -दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणार

23 जुलै व 24 जुलै 2019 (सकाळी 11cते सायंकाळी 5)- दुसऱ्या गुणवत्ता यादीतले विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणार

25 जुलै 2019 (सकाळी 11 ते दुपारी 3) -दुसऱ्या गुणवत्ता यादीतले विद्यार्थ्यांचे प्रवेश

25 जुलै, 2019-(7 वाजता)- शिल्लक जागांचा आढावा घेतला जाणार .

27 ते 29 जुलै, 2019 - (सकाळी 11 ते 5 पर्यंत) अर्जाचा भाग - 1 आणि भाग 2 भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध.

तिसरी फेरी

1 ऑगस्ट 2019 ( संध्याकाळी ६ वाजता) -तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणार

2 ऑगस्ट व 3 ऑगस्ट 2019 (सकाळी 11 ते सायंकाळी 5)- तिसऱ्या गुणवत्ता यादीतले विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणार

5 ऑगस्ट 2019  (सकाळी 11 ते दुपारी 3) -तिसऱ्या गुणवत्ता यादीतले विद्यार्थ्यांचे प्रवेश

5 ऑगस्ट, 2019-(7 वाजता)- शिल्लक जागांचा आढावा घेतला जाणार .

6  ते 7 ऑगस्ट , 2019 - (सकाळी 11 ते 5 पर्यंत) अर्जाचा भाग - 1 आणि भाग 2 भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध.

विशेष गुणवत्ता यादी

9 ऑगस्ट , 2019 - (संध्याकाळी 6 वाजता) विशेष गुणवत्ता यादी जाहीर करणे.

10 आणि 13 ऑगस्ट , 2019 - (सकाळी 11 ते 5 पर्यंत) विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश.

14 ऑगस्ट , 2019 - (सकाळी 10) रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.

मराठा विद्यार्थ्यांसाठी जात प्रामाणपत्र मुभा

शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हे खास बदल केले आहेत. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना तातडीने आपले जातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार नाही त्यांच्यासाठी पालकांचे हमीपत्र आणण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवेशप्रक्रिया काही दिवस अजून पुढे धाकली गेली असल्याने कॉलेज सुरु व्हायला ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडणार असल्याचे समजत आहे.