11th Admission 2019: ICSE विद्यार्थ्यांचे केवळ पहिल्या 5 विषयांचे गुण ग्राह्य धरणार; नवं परिपत्रक जाहीर
Representational Image (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य मंडळच्या दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी सरकारने आज दिलासादायक माहिती दिली आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या नव्या परिपत्रकानुसार, आता अकरावी प्रवेशप्रक्रियेदरम्यान राज्य मंडळाशी संलग्न कॉलेजमध्ये सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) सह इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्या गुणपत्रिकेतील केवळ पहिल्या पाच विषयंचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये मार्कांच्या तफावतीमुळे 11 वी प्रवेशप्र्क्रियेदरम्यान कट ऑफ लिस्ट कमी होण्याची शक्यता आहे. FYJC Admissions 2019: 11 वी प्रवेशप्रक्रिया सुरू; mumbai.11thadmission.net वर कशी पहाल Provisional आणि General Merit List 2019

राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, सरकारने इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्हचा पर्याय दिला होता. मात्र इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांचा फायदा मिळत असल्याने राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांना अधिक सरासरी गुण मिळत होते. हा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची भीती पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात होती.

यंदा अकरावीची प्रक्रिया सुरळीत आणि वेळेत पार पडावी म्हणून राज्यसरकारने ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्येमध्ये वाढ केली आहे. ऑनलाईन माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या 11 वी प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉलेजचा पसंतीक्रम भरायचा आहे. यामध्ये जुन्या नियमानुसार प्राधान्यक्रम भरणार्‍या विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातून अलर्ट दिला जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये बदल करायचे आहेत.