SSC & HSC Board Exam Results 2020: यंदा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर दहावी (SSC) आणि बारावीचे (HSC) निकाल हे उशिराने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आता हे निकाल साधारणपणे जूनच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात लागण्याचे अंदाज बांधले जात आहेत. यानुसार दहावीचा निकाल हा 10 जून रोजी तर 12 वी चा निकाल ही 12 ते 15 जूनच्या दरम्यान लागू शकतो असे म्हंटले जात आहे. यंदा राज्यात जवळजवळ 10 वी आणि 12 वी परिक्षेसाठी 15 लाख विद्यार्थी बसले होते या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर आपले निकाल पाहता येणार आहेत. 10th and 12th Board Exam Results 2020 Dates: SSC, HSC प्रमाणेच CBSE, ICSE/ ISC बोर्ड परीक्षांचे यंदाचे निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतात?
यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेत शेवटचा म्हणजे भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता ज्याचे गुण आता सरासरीनुसार देण्यात येणार आहेत. तर लॉकडाउन लागू होण्याआधी 12 वी बोर्ड परिक्षेच्या सर्व विषयांचे पेपर पूर्ण झाले होते. यामुळे या विद्यार्थ्यांना किंचित दिलासा आहे. अद्याप महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा निकालांची तारीख जाहीर झाली नसली तरी जेव्हा निकाल लागेल तेव्हा तो कसा पाहायचा? कुठे पाहायचा? असे प्रश्न तुम्हाला पडू नयेत म्ह्णून mahresult.nic.in वर हे निकाल कसे पाहावेत हे आपण जाणून घेऊयात.
महाराष्ट्र 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी या सोप्प्या स्टेप्स लक्षात ठेवा:
-निकाल पाहण्यासाठी प्रथम mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या
-Board Results ऑप्शनवर क्लिक करा
-MSBSHSE रिजल्ट पेज तुमच्या समोर सुरु होईल
- विद्यार्थ्याने त्याचा क्रमांक आणि अन्य तपशील द्यावा
-रिजल्ट पाहण्यासाठी तेथे देण्यात आलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे
-रिजल्ट दिसल्यावर त्याची प्रत Save करा.
दरम्यान, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुद्धा 15 जून पासून सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे,जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्यापद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे असे मत अलीकडे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.