Complain Against Mcdonald and Theobroma: मॅकडोनाल्डचा बर्गर आणि थिओब्रोमा बेकरीतील केक खाल्ल्याने दोघांची प्रकृती बिघडली; नोएडा येथील घटना
Photo Credit -Pixabay and X

Complain Against Mcdonald and Theobroma: मॅकडोनाल्ड (McDonald) खाद्य पदार्थांचा दर्जा खालावल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत बर्गर खाल्ल्याने एकाची तब्येत बिघडली. त्यामुळे नोएडामधील फूड चेन मॅकडोनाल्डच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिणामी मॅकडोनाल्डच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तक्रार ही ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आली आहे. एका ग्राहकाने फूड रेस्टॉरंटमधून आलू टिक्की बर्गर आणि फ्रेंच फ्राईज ऑनलाइन मागवले होते. ते खाल्ल्यानंतर तो आजारी पडला. दुसऱ्या घटनेत, नोएडा सेक्टर 104 मधील थिओब्रोमा (Theobroma) बेकरीमधून मागवलेला केक खाल्ल्याने एक महिला आजारी पडली.

याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून एफडीएने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. मॅकडोनाल्डमधूल पाम तेल, चीज आणि मेयोनीजचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यावर प्रतिक्रीया देताना एफडीएच्या सहायक आयुक्त (अन्न), अर्चना धीरन यांनी सांगितले की, “आम्हाला मॅकडोनाल्ड विरोधात तक्रार आढळली. आलू टिक्की आणि फ्रेंच फ्राईज खाल्यानंतर ग्राहक आजारी पडला. याबाबत कारवाई करण्यात आली असून पामतेल, चीज व मेयोनेझचे नमुने घेण्यात आले आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात थिओब्रोमा बेकरीविरोधात तक्रार नोएडामध्ये बेकरीतील शिळा केक खाल्ल्याने एक व्यक्ती आजारी पडला आहे. त्याबाबतही तपास सुरू आहे."

दुसऱ्या घटनेत, नोएडा सेक्टर 104 मधील थिओब्रोमा बेकरीमधून मागवलेला केक खाल्ल्याने एक महिला आजारी पडली. महिलेला शिळा केक देण्यात आला होता. तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने केकचे नमुने गोळा केले आहेत. पाईनअॅपल फ्लेवरचा हा केक होता.केकचा काही भाग प्रयोगशाळेत पासनीसाठी पाठवला आहे.