Video: 'एअरो इंडिया' शोच्या रिहर्सलदरम्यान दोन विमानांची हवेत टक्कर; एका वैमानिकाचा मृत्यू
एअरो इंडिया दरम्यान विमानांची टक्कर (Photo Credits: ANI)

बंगळूरू येथे हवाई दलातर्फे 'एअरो इंडिया' (Aero India 2019) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शांत सूर्यकिरण एरोबॅटिक संघ (Suryakiran Aerobatic Team) हवाई कसरती सादर करणार होता. यासाठी आज (मंगळवारी) प्रात्याक्षिके सुरु झाली. यावेळी 'मिड एआरो स्पिन मनुव्हर' करताना दोन विमानांची हवेत टक्कर होऊन मोठा अपघात झाला. प्रसंगावधान राखून दोन्ही विमांतील वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर उडी मारली, मात्र यामध्ये एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन वैमानिक जखमी झाले आहेत अशी महिती, डीजीपी फायर फोर्सेस एम. एन. रेड्डी यांनी दिली. बंगळूरूच्या एलहंका विमानतळावर हा अपघात झाला आहे.

हवाई दलातर्फे दर दोन वर्षानी आयोजित होणारे, 'एअरो इंडिया' हे प्रदर्शन यावर्षी बंगळुरू येथील एलहंका विमानतळावर 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देश विदेशातील अनेक विमान कंपन्या आपल्या विमानासह सहभागी होतात. भारताची सूर्यकिरण भारतीय हवाई दलातील एक तुकडीही कसरत सादर करणार होती, याच गोष्टीचे प्रात्यक्षिक आज चालू होते. कसरती करताना ही दोन विमाने एकमेकांसमोर आली आणि दोघांमध्ये टक्कर झाली. जमिनीवर कोसळल्यानंतर ही दोन्ही विमाने जळून खाक झाली. या अपघातात एका वैमानिकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.