Bihar News:  ट्रेन उशिरा असल्याने संतप्त प्रवाशाचा लोको पायलटवर जीवघेणा हल्ला, घटना कॅमेरात कैद, आरोपीला अटक
Bihar drunk passenger hits loco pilot PC Twitter

Bihar News: बिहारमध्ये ट्रेन उशीरा झाल्याच्या रागातून एका प्रवाशाने लोको पायलटला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील कटिहारमध्ये घडली. मद्यधुंद असलेल्या प्रवाशाने लोको पायलटाला मारहाण केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. कर्हागोला रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशाने लोको पायलटच्या डोक्यात दगड मारले आणि पीडित रक्तबंबाळ झाले आहे. (हेही वाचा- विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसीची बेदम मारहाण: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन TC निलंबित)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन अर्धा तास उशीर असल्याने एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने लोको पायलटवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपीने लोको पायलटच्या डोक्यात दगड घातले आहे, या घटनेत पीडित गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आरोपीने दारूच्या नशेत लोका पायलटसह अनेक प्रवाशांना देखील शिवीगाळ केल्याचे दिसत आहे.

एका युजर्सनी हा व्हिडिओ क्सवर पोस्ट केला असून भारतीय रेल्वे विभागाला टॅग केला आहे. वृत्तानुसार बुधवारी 17 जानेवारी समस्तीपूर- कटिहार पॅसेंजर ट्रेन क्रमांक 03316 ही घटना घडली तेव्हा अर्धा तास उशिराने धावत होती. काही कारणांमुळे ट्रेन स्टेशनवरच थांबवण्यात आली होती तेव्हा ही घटना घडली. सुशील कुमार असे आरोपीचे नाव असून तो कर्हागोला येथील रहिवासी असून तो ट्रेनमध्ये चढण्यासाठी स्टेशनवर थांबला होता.या घटनेची माहिती  रेल्वे पोलिसांना देण्यात आली असून रेल्वे स्टेशनवरून पोलिसांनी आरोपीला मद्यधुंद अवस्थेत असताना अटक केले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.