DRDO Tapas Drone Uav Crashes: डीआरडीओ (DRDO) चे तापस ड्रोन (Tapas Drone) ट्रायल फ्लाइट दरम्यान क्रॅश झाले आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) चे मानवरहित हवाई वाहन म्हणजेच UAV चाचणी उड्डाणावर होते. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे ते रविवारी सकाळी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावात शेतात कोसळले. संरक्षण अधिकार्यांनी सांगितले की, चाचणी उड्डाण दरम्यान डीआरडीओचे तापस ड्रोन क्रॅश झाले. डीआरडीओने संरक्षण मंत्रालयाला याबाबत माहिती दिली असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. त्याचवेळी ड्रोन कोसळल्याची बातमी समजताच अपघातस्थळी नागरिकांची गर्दी झाली.
तापस ड्रोन 'मीडिया अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स' (MALE) श्रेणीतील आहे. गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आणि पाळत ठेवण्याची क्षमता सुधारण्यासाठी तपस ड्रोन सैन्यात खूप महत्वाचे आहेत. यासोबतच भारताने अमेरिकेच्या 31 MQ 9B प्रीडेटर ड्रोनसाठी तीन अब्ज डॉलर्सचा करारही केला होता. तपसची चित्रदुर्गाच्या एरोनॉटिकल चाचणी श्रेणीत चाचणी केली जात आहे आणि रविवारी एक ड्रोन क्रॅश झाला.
डीआरडीओचे तापस ड्रोन कमाल 30 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. हे इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार पेलोडसह 250 किमीच्या रेंजसह 24 तास उड्डाण करू शकते. हे ड्रोन जास्तीत जास्त 350 किलो वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकते. हे ड्रोन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे.
#WATCH | A Tapas drone being developed by the DRDO crashed today during a trial flight in a village of Chitradurga district, Karnataka. DRDO is briefing the Defence Ministry about the mishap and an inquiry is being carried out into the specific reasons behind the crash: Defence… pic.twitter.com/5YSfJHPxTw
— ANI (@ANI) August 20, 2023
यावर्षी बंगळुरू येथे झालेल्या एअर शोमध्येही ते प्रदर्शित करण्यात आले होते. TAPAS चे पूर्ण नाव 'टैक्टिकल एअरबोर्न प्लॅटफॉर्म फॉर एरियल सर्व्हिलन्स' आहे. सीमेवर लक्ष ठेवण्याच्या आणि शत्रूवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने हे ड्रोन अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.