डॉ. कृष्णा गोपाळ शर्मा यांच्याकडून इम्रान खान यांचे अभिनंदन; म्हणाले, जगानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारताला एकसारखे पाहिले पाहिजे
Dr.Krishna Gopal Sharma (Photo Credit:ANI)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) नेते डॉ. कृष्णा गोपाळ शर्मा (Dr.Krishna Gopal Sharma) यांनी आज एका वृत्त संस्थेशी बोलताना पाकिस्तानचे (Pakistan) प्रंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांचे अभिनंदन केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या (United Nation) महासभेत इम्रान खान यांनी भाषण केले होते. इम्रान खान यांचे भाषण प्रामुख्याने इस्लामोफोबिया (Islamophobia), काश्मीर (Kashmir) आणि आरएसएसवर (RSS) होते. यावर डॉ. शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सयुंक्त राष्ट्र संघाच्या महासभेत इम्रान खान यांनी भारत आणि आरएसएस यांना समानार्थी संबोधले होते. यामुळे डॉ. शर्मा यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करत जगानेही आरएसएस संघ आणि भारताला (India) एकसारखे पाहिले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना कृष्णा गोपाळ शर्मा यांनी सांगितले की, आरएसएस संघ फक्त भारतातच आहे. इतर कोणत्याही देशात त्याची शाखा नाही. जर पाकिस्तान आमच्यावर रागावला असेल तर, याचा अर्थ असा आहे की ते भारतावर रागावले आहेत. यामुळे आरएसएस आणि भारत आता समानार्थी झाले असल्याचे स्पष्ट होते. जगानेही भारत आणि आरएसएसला एकसारखे पाहिले पाहिजे, अशी आमची इच्छा होती. यासाठी संघाचे नेते डॉ. शर्मा यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन केले आहे. हे देखील वाचा- संयुक्त राष्ट्रात भारताकडून पाकिस्तानला कडक प्रत्त्युत्तर; Right To Reply अंतर्गत इम्रान खान यांच्या भडकाऊ विधानांवर विदिशा मैत्रा यांच्याकडून प्रतिक्रिया

ANI चेे ट्विट- 

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत इम्रान खान म्हणाले होते की, काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांच्या गृहमंत्र्यांनी आरएसएसच्या छावणीत दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असे विधान केले होते. महत्वाचे म्हणजे एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाषण करताना शांतता आणि सद्भावनाबद्दल बोलत होते, तर दुसरीकडे इम्रान खान यांचे भाषण युद्ध आणि काश्मीरच्या धमकीवर अधारीत होते.