Dog Attack In Delhi: दिल्लीतील रोहिणी परिसरात एका पाळीव कुत्र्याने सात वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. एका शेजारी राहणाऱ्या पाळीव कुत्र्याने हल्ला केला. अमेरिकन बुल्ली डॉग या प्रजातीचा आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा- आता कुत्रा चावल्यावर सरकारला द्यावी लागणार भरपाई;)
मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या 7 वर्षाच्या मुलीवर पाळीव कुत्र्याने हल्ला केला या प्रकरणी मालकाविरुध्दात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, मुलीच्या उजव्या खांद्यावर आणि अंगावर अनेक जखमा झाल्या आहेत. तात्काळ मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मालकाविरुध्दात गुन्हा दाखल करून घेतला. कलम 289 (प्राण्यांबाबत निष्काळजी वर्तन) आणि 337 (मानवी जीव धोक्यात आणणारी किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या व्यक्तीला इजा पोहोचवणारी अविचारी किंवा निष्काळजी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी मैत्रणीसोबत बाहेर खेळत असताना, तिच्यावर हल्ला केला. पोलिस या प्रकरणात तपास करत आहे. अमेरिकन बुली कुत्र्यांच्या जातीच्या हल्ल्यांमुळे केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अमेरिकन एक्सएल बुली डॉग जातीवर बंदी घालण्याची शपथ घेतली.