Shraddha Murder Case (Photo Credit-Twitter/ ANI)

Shraddha Murder Case: श्रद्धा वॉकर (Shraddha Walker) हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बुधवारी सांगितले की, जंगलात मिळालेली हाडे (Bone) आणि केस (Hair) श्रद्धाच्या DNA शी जुळतात. श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना मेहरौलीच्या जंगलातून केस आणि हाडे सापडली होती. हे हाडे व केस श्रद्धाचे आहेत हे तपासण्यासाठी नमूने हैदराबाद लॅबमध्ये पाठवण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मेहरौलीच्या वनक्षेत्रात सापडलेल्या आणि हैदराबादमधील डीएनए फिंगरप्रिंटिंग डायग्नोस्टिक (सीडीएफडी) केंद्राकडे तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांचे माइटोकॉन्ड्रियल डीएनए अहवाल पीडितेच्या वडील आणि भावाशी जुळले आहेत. (हेही वाचा - Shraddha Murder Case: हत्येनंतर काही दिवसांनीचं आफताबने बनवली दुसरी गर्लफ्रेंड; भेट म्हणून दिली श्रद्धाची अंगठी)

विशेष पोलिस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितलं की, शरीराच्या अवयवांमधून डीएनए काढता येत नसल्याने हाडे आणि केसांचे नमुने डीएनए माइटोकॉन्ड्रियल प्रोफाइलिंगसाठी हैदराबादला पाठवण्यात आले. ते म्हणाले की, माइटोकॉन्ड्रियल डीएनए अहवालाने श्रद्धा वॉकरसोबत केस आणि हाडांचे नमुने जुळल्याची पुष्टी केली आहे. दिल्ली पोलिसांना सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि डायग्नोस्टिक्सकडून अहवाल प्राप्त झाला आहे.

आफताबवर खुनाचा आरोप -

श्रद्धाची हत्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने केल्याचा आरोप आहे. आफताबने हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. तब्बल 18 दिवस हे तुकडे तो रात्रीच्या वेळी तो वेगवेगळ्या ठिकाणी फेकत राहिला.

आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. विशेष म्हणजे सध्या दिल्ली पोलिस या हत्येचा तपास करत आहेत. नोव्हेंबरमध्ये श्रद्धाचे वडील विकास मदन वालकर यांनी मुंबई पोलिसांकडे जाऊन मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.