BJP प्रचारासाठी जेठालाल यांचा रोड शोमध्ये सहभाग; राहुल गांधी 'कॉमेडीयन' असल्याची टीका (Video)
दिलीप जोशी (Photo Credits: Facebook)

टीव्ही वरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Oolta Chashma) मधील जेठालालची भूमिका निभावणारे दिलीप जीशी (Dilip Joshi) आता भाजप च्या (Bhartiya Janta Party) प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. काल (29/11/2018) गुरुवारी राजस्थानच्या (Rajasthan) चित्तोडगड जिल्ह्याच्या बडीसादडी विधानसभा परिसरात भाजपा समर्थनार्थ जेठालाल रोड शो मध्ये सहभागी झाले. यावेळी जेठालाल यांना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली.

रोड शो दरम्यान दिलीप जोशी यांनी काँग्रेस  (Congress) नेता राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका केली. तसंच राहुल गांधी कॉमेडियन असल्याचेही ते म्हणाले. जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला मिळत आहे.

मागील वेळेस लोकसभा निवडणूकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलीप जोशी यांनी बनारस निवडणूकीदरम्यान प्रचार केला होता.