Ghaziabad House Collapse: गाझियाबादमध्ये दोन मजली जीर्ण घर कोसळले, अनेक जण गाडले; पाच जणांना वाचवण्यात यश
House Collapse प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Twitter/ANI)

Ghaziabad House Collapse: गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये लोणी रूप नगर औद्योगिक परिसरातील एक जीर्ण दुमजली घर कोसळले. घरात पाच जण गाडले गेले. पाचही जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घर कोसळल्यानंतर पोलिसांसह स्थानिक लोक ढिगारा हटवण्यात व्यस्त आहेत. या प्रकरणात अद्याप मृत्यूची पुष्टी झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी या परिसरातील बांधकाम सुरू असलेले घरही कोसळले होते. येथील इतर अनेक घरेही जीर्ण अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत त्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही नोटीस बजावली जाऊ शकते. लोणी रूप नगर औद्योगिक परिसरात कोसळलेल्या घरामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा -Ludhiana Suicide Case: मानसिक छळाला कंटाळून 8 वीच्या वर्गातील विद्यार्थीनीने उचललं धक्कादायक पाऊल; शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न)

ढिगाऱ्यात अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहेत. घरातील ढिगारा हटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. हे घर मातीचे होते.