Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अलीराजपूर (Alirajpur) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरात पाच जणांचे मृतदेह लटकलेले आढळले. लटकलेल्या अवस्थेत सापडलेले मृतदेह पती, पत्नी आणि तीन मुलांचे होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण हत्या (Murder) आहे की सामूहिक आत्महत्या (Suicide) याचा तपास पोलीस करत आहेत. अशीच एक घटना 6 वर्षांपूर्वी दिल्लीतील बुरारी (Burari) येथे घडली होती.
ही घटना अलीराजपूर जिल्ह्यातील सांडवा पोलीस स्टेशन क्षेत्रातील राउडी गावातील आहे. जिथे सोमवारी सकाळी 7 वाजता पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश व्यास यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एफएसएलची टीमही घटनास्थळी पोहोचणार आहे. (हेही वाचा -Telangana News: मातीचं छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, तेंलगणातील घटना)
अलीराजपूर पोलिसांनी पती जागर सिंह, त्याची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी, मुलगा प्रकाश आणि अक्षय अशी मृतांची ओळख पटवली आहे. मृतकाचे काका राकेश यांना या घटनेची पहिली माहिती मिळाल्यावर ते सकाळी घरी पोहोचले असता हे भयानक दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. संपूर्ण कुटुंबीयांचे मृतदेह सापडल्याने गावात शोककळा पसरली आहे. जागर सिंग असे पाऊल उचलू शकतात यावर शेजारी आणि गावकऱ्यांचा विश्वास बसत नाहीये. (Woman Beaten On Street In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये TMC नेत्याची तरुण-तरुणीला रस्त्यात काठीने बेदम मारहाण; भाजपने ममता बॅनर्जीला केली कारवाईची मागणी (Watch Video))
मृत जागर हा शेतकरी असून त्याने शेतात घरही बांधले होते. त्यांनी कधीही त्यांच्या कुटुंबीयांना किंवा गावातील लोकांसमोर अशी कोणतीही समस्या सांगितली नव्हती. जागर यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस या गुन्ह्याचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
बुरारी प्रकरण -
1 जुलै 2018 रोजी बुरारी, दिल्ली येथून असेच प्रकरण समोर आले होते. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह घरात कसे लटकलेले आढळले होते.