
Delhi Weather Update: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा दोन अंश कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली. हवामान खात्यानुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
राजधानीत सकाळी 8.30 वाजता सापेक्ष आर्द्रतेची पातळी 47 टक्के नोंदवली गेली. दिवसभरात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.