Photo Credit- X

PM Modi Celebrates Raksha Bandhan: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रक्षाबंधन सण साजरा केला. दिल्लीतील शाळेकरी विद्यार्थीनींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थीनींसोबत संवाद साधला. हास्य-विनोद केले. रक्षाबंधन सण साजरा करानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र गे रक्षाबंधन खास पद्धतीने साजरे करण्यात आले. विद्यार्थीनींनी बाधलेल्या राखी या साध्या नसून राखींवर पंतप्रधान मोदींचे त्यांच्या आईसोबतचे खास फोटो आहेत. त्याशिवाय पर्यवरणाशी संबंधीत जागृकता निर्माण करणारे संदेश राखींवर लिहिण्यात आले आहेत. (हेही वाचा:Sudha Murty Troll: रक्षाबंधन दिवशी एक्स पोस्टमुळे सुधा मूर्तीं ट्रोल; बहिण-भावाच्या नात्याचा थेट मुघलांशी संबंध जोडला )

देशभरात आज रक्षाबंधणाचा सण मोठ्या उत्‍साहात साजरा होत आहे. बहीण भावातील पवित्र नात्‍याच्या या सणाला भारतीय समाजामध्ये अनन्यसाधारण महत्‍व आहे. त्‍या पार्श्वभूमीवर आज शाळकरी मुलींनी पीएम मोदी यांच्या हाती राखी बांधली. या राखीत मोदी यांची दिवंगत आई यांचा फोटो असून, मोदी हे आपल्‍या मातोश्रींचे पाय धूत असल्‍याचा हा फोटो आहे. शिवाय या राखीमध्ये एक झाड आईच्या नावे हा संदेशही लिहिण्यात आला आहे.

शालेय मुलींनी मोदी यांना राखी बांधल्‍यावर मोदी यांनी त्‍यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आशिर्वाद दिले. तसेच यावेळी मोदींनी या शालेय मुलींशी हसतखेळत गप्पा मारत त्‍यांची विचारपूस केली.

पोस्ट पहा

रक्षाबंधन सणाच्या पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्‍या आहेत. मोदींनी एक्‍सवर लिहिले की, 'देशवासियांना बहिण-भावाच्या अपार स्‍नेहाचे प्रतिक असलेल्‍या रक्षाबंधन सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा पवित्र सण तुमच्या नात्यात नवीन गोडवा घेऊन येवो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येवो.'