Delhi Rain Update: राष्ट्रीय राजधानीत पावसानंतर पाणी साचल्यामुळे पूर्व आणि पश्चिम दिल्लीसह अनेक भागांत गुरुवारी वाहतूक कोंडी झाली. गुरुवारी सकाळी इंडिया गेट, जनपथ रोड, आरके पुरम, कालिंदी कुंज, गाझीपूर, इंदिरापुरम, लक्ष्मी नगर, द्वारका, कॅनॉट प्लेस, नोएडा, सफदरजंग, उत्तम नगर, पूर्व कैलास आणि रोहिणीसह दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये हलका पाऊस झाला. "GTK डेपोजवळ पाणी साचल्यामुळे, GTK रोडवर मुकरबा चौकातून आझादपूर चौकाकडे आणि त्याउलट वाहतुकीवर परिणाम झाला आहे," असे दिल्ली वाहतूक पोलिसांनी 'X' वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, खानापूर टी पॉइंटपासून मेहरौलीकडे जाणाऱ्या मार्गावर एम.बी. रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. तसेच रोहतक रोडवरही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. हे देखील वाचा: Weather Forecast: देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस, येथे जाणून घ्या, आजचा अंदाज
नवादा ते उत्तम नगर या नजफगढ रोडवर बीएसईएसकडून सुरू असलेल्या कामामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहित तोमर, एक प्रवासी म्हणाले की, “दिलशाद गार्डनमधील इहबास हॉस्पिटलजवळ मोठी वाहतूक कोंडी होती. एका महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी कर्करडूमा न्यायालयात पोहोचायला मला अर्धा तास जास्त लागला.
पश्चिम दिल्लीतील ब्रिटानिया उड्डाणपूल आणि पंजाबी बाग आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतील मंगोलपुरी उड्डाणपुलाजवळही ट्रॅफिक जाम झाल्याची नोंद झाली आहे. दुसरा प्रवासी गौरव कुमार यांनी सांगितले की, हैदरपूर आणि रोहिणी पूर्व मेट्रो स्थानकाजवळ वाहतुकीवर परिणाम झाला आहे.