निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Case) दोषी विनय शर्माची (Vinay Sharma) वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भातील मागणी याचिका (Petition )दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने (Delhi Patiala House Court) फेटाळली आहे. विनयने न्यायालयाकडे मानसिक तणावाखाली असल्याने आपल्याला तात्काळ उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केली होती. या प्रकरणी आज दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टात सुनावणी झाली.
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सांगितलं की, फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दोषीच्या बाबतीत चिंता आणि नैराश्य स्वाभाविक आहे. दोषी विनयवर पुरेसे वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. यामुळे त्याची याचिका फेटाळण्यात येत आहे, असंही न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटलं आहे. (हेही वाचा - Honour Killing: गोत्राबाहेर लग्न केल्याने आई वडिलांनीच गळा दाबून केली मुलीची हत्या; कुटुंबातील इतर सदस्यांनी दिली साथ)
During the hearing of 2012 Delhi gang-rape case, the court observed, 'General anxiety and depression in case of a death row convict is obvious. In the case at hand, evidently, adequate medical treatment and psychological help have been provided to the condemned convict'. https://t.co/Sp9szQFGZI
— ANI (@ANI) February 22, 2020
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape case victim: It was a tactic to delay the execution. The convicts are misleading courts. They have exhausted almost all legal remedies and I believe that they will be hanged on March 3. https://t.co/Sp9szQFGZI pic.twitter.com/Td5rPUQn5J
— ANI (@ANI) February 22, 2020
काही दिवसांपूर्वी दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगात भिंतीवर डोकं आपटलं होतं. त्यामुळे विनयच्या वकिलाने त्याचं मानसिक संतुलन ठिक नसल्याचं म्हणत त्याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे, अशी मागणी करणारी याचिका केली होती. निर्भया प्रकरणातील दोषींना येत्या 3 मार्चला फाशीची शिक्षा होणार आहे. आरोपी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना यात यश येणार नाही, असं निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.