Delhi Deputy CM Manish Sisodia Tests Positive For Coronavirus: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासंदर्भात सिसोदिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.
ट्विटरवरील पोस्टमध्ये मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, 'हलका ताप आल्याने आज कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. सध्या ताप तसेच इतर कोणतीही लक्षणं नाहीत. मी पूर्णपणे ठीक आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकर बरा होईल आणि आपल्या कर्तव्यावर हजर होईल.' दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीमध्ये आज 3,229 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,21,533 इतकी झाली आहे. (हेही वाचा - 17 MPs COVID Positive: मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि परवेश साहिब सिंह समवेत 17 खासदार आढळले कोरोना पॉझिटिव्ह, आजपासून सुरु झाले अधिवेशन)
Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia says, he has tested positive for COVID19 pic.twitter.com/wqG0yTQy75
— ANI (@ANI) September 14, 2020
सध्या शहरात 28,641 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1,88,122 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरात आतापर्यंत 4,770 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात दिल्ली सरकारने माहिती दिली आहे.