
New Delhi Crime: उत्तर दिल्लीत चार अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीच्या जोरावर एका व्यक्तीकडून 1 कोटी रुपये लुटले, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. मोती नगर येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी सुरेश यांनी पोलिसांना सांगितले की, बुधवारी कमलेश शहा याने त्यांना चांदणी चौकात एक कोटी रुपयांच्या दोन पिशव्या दिल्या. पोलीसांनी चार ही अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुपारी 3.30 च्या सुमारास ते राकेशसह ऑटो रिक्षाने चांदणी चौकाकडे जात होते. ते वीर बंदा बैरागी मार्गावरील मेट्रो पिलर क्र. 147 जवळ पोहोचले असता, चार जण दोन वरून आले, त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन बॅग लुटून प्रताप नगर मेट्रो स्टेशनच्या दिशेने पळ काढला. "उत्तरचे पोलिस उपायुक्त सागर सिंग कलसी म्हणाले. "गुलाबीबाग पोलिस ठाण्यात आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे," ते पुढे म्हणाले.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे,नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलीसांना या चोरट्यांना लवकरात लवकर पडकावे अशी विंनती फिर्यादीने केली आहे. या घटने अंतर्गत पोलीस चौकशी करत आहे.