DCW Swati Maliwal (PC - Facebook)

Delhi: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा (Delhi Commission for Women Chief)स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना कारमधून ओढत नेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी रात्री उशिरा एका कार चालकाने त्यांना 10-15 मीटरपर्यंत ओढत नेलं. कार चालकाने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले असता त्यांनी प्रतिकार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी गाडीच्या चालकाला अटक केली असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर या घटनेबाबत स्वाती मालीवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 3.11 वाजता घडली. एम्सच्या गेट क्रमांक दोनसमोर कार चालकाने स्वाती मालीवाल यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. मालीवाल तिला खडसावत असताना कारचालक हरिश्चंद्रने कारची विंडशील्ड वर केली. यामुळे स्वाती मालीवाल यांचा हात गाडीत अडकला. यानंतर कार चालकाने त्यांना 10 ते 14 मीटरपर्यंत ओढले. (हेही वाचा - Scoot Airline कंपनीच्या विमानाचे 35 प्रवाशांना जमिनीवर विसरुन हवेत उड्डाण, DGCA कडून चौकशिचे आदेश)

स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बालिनो कारमधील एका व्यक्तीने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. स्वाती मालीवाल यांनी नकार दिल्याने आरोपी निघून गेला. मात्र पुन्हा यू-टर्न घेऊन सर्व्हिस लेनमधून परत आला. कार चालकाने पुन्हा स्वाती यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. यानंतर स्वाती यांनी पुन्हा या व्यक्तीला नकार दिला. स्वाती मालीवाल यांनी आरोपीला पकडण्यासाठी खिडकीतून हात घालला. मात्र, यादरम्यान आरोपीने खिडकी बंद केली. यात स्वाती यांचा हात अडकला.

आरोपीने त्यांना 15 मीटरपर्यंत ओढत नेले. त्यानंतर पोलिसांनी स्वाती मालीवाल यांची लेखी तक्रार घेऊन आरोपी हरीश चंद्र (वय, 47) याला अटक केली. त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपी संगम विहार येथील रहिवासी आहे.