दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त BJP च्या 'सेवा सप्ताह'ला सुरूवात; अमित शहा, जे पी नड्डा यांनी केली AIIMS मध्ये साफसफाई
Amit Shah (Photo Credits- ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर देशात 'सेवा सप्ताह' सुरू करण्यात आला आहे. मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबर दिवशी आहे, मात्र आजपासून 20 सप्टेंबर 'सेवा सप्ताह' (Seva Saptah)सुरू करण्यात आला आहे. या सेवा सप्ताहच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा कार्यवाहक अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एम्स रूग्णालयात साफसफाई करत 'सेवा सप्ताह'ला सुरूवात केली आहे. दरम्यान अमित शहा यांनी एम्समध्ये बालरूग्णांना फळांचे देखील वाटप केले.

भारतीय जनता पक्षाने आज (14 सप्टेंबर) पासून सेवा सप्ताहाला सुरूवात केली आहे. तसेच हा उपक्रम देशासतील सार्‍याच राज्यांमध्ये साजरा केला जाणार आहे. 14 ते 20 सप्टेंबर

दरम्यान हा सेवा सप्ताह साजरा केला जाईल. आज ट्वीटरच्या माध्यमातून अमित शहा यांनी देशवासीयांनाही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सिंगल युज प्लॅस्टिकपासून मुक्ती, जल संरक्षण आणि संवर्धन तसेच स्वच्छता हीच सेवा ही उद्दीष्ट भारतीयांपर्यंत पोहचवण्याचं लक्ष्य असल्याचे सांगितले जात आहे.

Amit Shah Tweet 

अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा सेवा सप्ताहामध्ये करोडो कार्यकर्त्यांसह विविध ठिकाणी साफ सफाई, वृक्षारोपण, श्रमदान करून हा सेवा सप्ताह साजरा करणार आहे.