Indore Shocker: बीएसएफच्या प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलाचा विहिरीत सापडला कुजलेला मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Indore Shocker:  सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ ( 25 ) वर्षीय प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलचा मृतदेह विहरीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.ही घटना इंदौर ट्रेनिक फॅसिलिटी कॅम्पसमध्ये घडली. सोमवारी बीएसएफ कॅम्पसमध्ये एका झाकलेल्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाहीत. प्रथमदर्शनी त्याने विहिरीत उडी घेतल्याचे सांगत आहे. गेल्या बुधवारपासून तो बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एअरोड्रोम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. हेही वाचा- बंद बॅगेत सापडला तरुणीचा मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष साहो असं मृताचे नाव असून तो झारखंड येथील हजारीबागाचा रहिवासी होता. 2023 च्या बॅचचा हवालदार होता. कॅम्पसमधील एका विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने विहिरीत तपासणी करण्यास सांगितले,त्यानंतर विहिरीतून सुभाषचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुभाषचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. विहिरित दोन दिवस मृतदेह पडून राहिल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

सुभाषच्या मित्राने सांगितले की, सुभाष बुधवारी पीटी सत्रात सहाभागी होता नंतर तो आराम करण्यासाठी गेला. त्यानंतर पुन्हा परेडसाठी तो आलाच नाही. सुभाष बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. परेड साठी हवालदारांची मोजणी करण्यात आली होती परंतु सुभाष नसल्यामुळे खळबळ उडाली. सुभाष बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. दोन दिवसांनी विहिरीतून दुर्गंधी आल्यानंतर सुभाषचा पत्ता लागला. सुभाष विहिरत कसा पडला याची अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे.