Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत शनिवारी घसरण पाहायला मिळाली. शनिवारी ब्रेंट क्रूड 1.19 डॉलर्स ने खाली येऊन 95.77 डॉलर प्रति बॅरल झालं आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
देशातील चार मोठ्या महानगरांबद्दल बोलायचे झाले तर किमती स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. (हेही वाचा - UN Security Council Committee: दहशतवादाबाबत UNSC समितीची आज दुसरी बैठक; मुंबईनंतर आता दिल्लीतून होणार पाकिस्तानवर हल्ला)
'या' शहरांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर -
- नोएडामध्ये पेट्रोल 97 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर आहे.
- गुरुग्राममध्ये पेट्रोलची किंमत 96.77 रुपये आणि डिझेलची किंमत 89.65 रुपये आहे.
- लखनौमध्ये एक लिटर पेट्रोल 96.62 रुपये आणि डिझेल 89.81 रुपये प्रति लिटर आहे.
- पटनात पेट्रोल 107.24 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.04 रुपये आहे.
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.61 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले जातात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून कर, वाहतूक खर्च आणि डिझेल कमिशन यांचा समावेश केला जातो.