Lucknow Building Collapse Update: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) ची राजधानी लखनऊ (Lucknow) मध्ये शनिवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. ट्रान्सपोर्ट नगर (Transport Nagar) मध्ये तीन मजली इमारत कोसळल्याने अनेकजण जखमी झाले. या अपघातातील मृतांची संख्या 8 झाली असून 28 जण जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हरमिलाप इमारतीत तीन मजले होते. खाली मोबाईल आणि स्पेअर पार्ट्सचे काम सुरू होते. मधल्या मजल्यावर औषधांचे गोदाम आणि तिसऱ्या मजल्यावर भेटवस्तूंचे गोदाम होते. सर्वाना खालच्या मजल्यावरून बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दोन मजल्यांच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ढिगाऱ्यातून आवाज शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बचाव अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा -Lucknow Building Collapse Update: लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री योगींनी घेतली अपघाताची दखल)
लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळल्याने अनेक लोक गाडले गेल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. तथापी, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरमिलाप बिल्डिंग असे या इमारतीचे नाव असून ती तीन मजली आहे. इमारतीत औषधांची खरेदी-विक्री होते. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. गरज भासल्यास अतिरिक्त रुग्णवाहिका मागवण्यात आल्या आहेत. जखमींना लोकबंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Lucknow Building Collapses: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये तीन मजली इमारत कोसळून १० जण जखमी, अनेक जण अडकल्याची भीती)
लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगर अपघात; बचावकार्य सुरू, पहा व्हिडिओ -
#WATCH | Uttar Pradesh: Visuals from the spot where 8 people died and 28 others have been injured after a building collapsed in Lucknow yesterday.
Rescue operations to evacuate the trapped people are underway. pic.twitter.com/IU47yWoYAU
— ANI (@ANI) September 8, 2024
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. तसेच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य लवकर सुरू करण्यास सांगितले आहे. लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले स्थानिक प्रशासन घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत असून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.