उत्तर प्रदेशातील लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये शनिवारी संध्याकाळी तीन मजली इमारत कोसळून किमान 10 जण जखमी झाले. इमारत कोसळल्याने इमारतीजवळ उभ्या असलेल्या ट्रकचाही चक्काचूर झाला. एनडीआरएफ, एसआरडीएफ, अग्निशमन विभाग, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबधित घटकांना तत्काळ वेगाने बचाव कार्य करण्याचे निर्देश हे दिले आहे. तसेच त्यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. (हेही वाचा - Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, जिरीबाममध्ये 5 जणांचा मृत्यू)
पाहा पोस्ट -
#UttarPradesh: A three story building collapsed in transport Nagar area of Lucknow. Rescue and relief work is underway. More Details are awaited.
Chief Minister Yogi Adityanath has instructed officials to intensify the rescue operation. pic.twitter.com/EjHC8WnETt
— All India Radio News (@airnewsalerts) September 7, 2024
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये शनिवारी तीन मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली सुमारे 10 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोसळून किमान एकाचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. लखनऊच्या ट्रान्सपोर्ट नगर भागात इमारतीच्या तळघरात काम सुरू असताना ही घटना घडली. हरमिलाप बिल्डिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीचा वापर औषधी व्यवसायासाठी केला जात होता.