मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात शनिवारी सकाळी उसळलेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, झोपेत असताना एका व्यक्तीला गोळी मारण्यात आली, तर दोन प्रतिस्पर्धी समुदायातील सशस्त्र लोकांमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, , ज्यामध्ये तीन अतिरेक्यांसह चार सशस्त्र लोक ठार झाले. (हेही वाचा - Manipur Rocket Attack: मणिपूरमध्ये रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जखमी; चौकशी सुरू)
या घटनेबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला, जिल्ह्यातील संशयित "ग्रामीण स्वयंसेवकांनी" बोरोबेक्रा पोलिस स्टेशन अंतर्गत जाकुराधोर येथे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे तीन खोल्यांचे घर जाळले होते.
आदिवासी संघटना आदिवासी जमाती वकिल समितीने (फेरजौल आणि जिरीबाम) या घटनेत कोणताही सहभाग नाकारला आहे. मेतेई आणि हमार समुदायांच्या प्रतिनिधींनी 1 ऑगस्ट रोजी आसाममधील कछार येथील CRPF कार्यालयात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी आणि जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केल्यानंतरही, या भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.