उत्तर प्रदेशची राजधानी आहे. येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये मीठ, तेल, पाइप आणि औषध कंपनीचे गोदाम होते, त्यामध्ये काम करणाऱ्या अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी हजर असून बचावकार्य करत आहेत. एनडीआरएफची एक टीम आणि एसडीआरएफच्या दोन टीमही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (हेही वाचा - Lucknow Building Collapses: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये तीन मजली इमारत कोसळून १० जण जखमी, अनेक जण अडकल्याची भीती )

सीएम योगी यांनीही या अपघाताची दखल घेतली आहे. युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य राबवावे आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी भगवान श्रीरामांची प्रार्थना केली.

पाहा व्हिडिओ -

 

पाहा योगी आदीत्यनाथ यांची पोस्ट -

मदत आयुक्त जीएस नवीन कुमार यांनी सांगितले की, ही घटना सरोजिनी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये संध्याकाळी 5 वाजता घडली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या बचाव पथकांना मदतकार्यात तैनात करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून बचाव कार्यावर लक्ष ठेवले आहे.