Dead Rat in Namkeen Packet (फोटो सौजन्य - X/@Zee24Kalak)

Dead Rat Found in Namkeen Packet: आपण बाहेर गेल्यानंतर सीलबंद स्नॅक्सचा आनंद घेतो. विशेषत: लहान मुलांसाठी सीलबंद स्नॅक्स एक प्रकारचे आकर्षण असते. पण असे पॅकेट स्नॅक्स किंवा खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी ते एकदा नक्की तपासा. गुजरातमधील साबरकांठा येथे एका लहान मुलीला सीलबंद स्नॅक्स खाणे खूप महागात पडले आहे. अतिसारामुळे (Diarrhoea) तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील साबरकांठा येथील प्रेमपूर गावातील आहे. जिथे मुलीने एका लोकप्रिय ब्रँडच्या सीलबंद पॅकेटमधील स्नॅक्स खाल्ले आणि तिला जुलाब झाले. या सीलबंद स्नॅक्स पॅकेटमध्ये चक्क एक मेलेला उंदीर (Dead Rat in Namkeen Packet) आढळला.

गोपाल नमकीनच्या पॅकेटमध्ये आढळला उंदीर -

प्राप्त माहितीनुसार, लोकप्रिय ब्रँड गोपाल नमकीनच्या पॅकेटमध्ये एक मृत उंदीर आढळला. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही गोपाळ नमकीनचे एक पॅकेट विकत घेतले होते. आम्ही तो नाश्ता आमच्या मुलीला खायला दिला. स्नॅक्स खाल्ल्यानंतर माझ्या मुलीला उलट्या होऊ लागल्या. आम्हाला या पाकिटात एक मेलेला उंदीर सापडला. (हेही वाचा -Dead Rat Found In Hershey's Chocolate Syrup: झेप्टोवरून ऑर्डर केलेल्या चॉकलेट सिरपमध्ये सापडला मृत उंदीर; पहा व्हायरल व्हिडिओ)

मुलगी रुग्णालयात दाखल -

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, नमकीन खाल्ल्यानंतर माझी मुलगी आजारी पडली आणि तिला जुलाब होऊ लागले. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला दावड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी गोपाल नमकीन यांच्या निष्काळजीपणाविरुद्ध अन्न आणि औषध विभागाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. (हेही वाचा - Pune News : शीतपेय पिताय तर थांबा! जुन्ररमध्ये बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर (Watch Video))

गुजरातमध्ये नमकीनच्या पॅकेटमध्ये सापडला मृत उंदीर  - 

यापूर्वीही घडली होती अशीच घटना -

अशा प्रकारे अन्न पदार्थात उंदीर सापण्याची ही पहिलीच घटना नाही. अशा बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. यापूर्वी कावेरी पाणी वादावरून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यानही असेच एक प्रकरण समोर आले होते. निषेधादरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना नाश्त्यात एक मेलेला उंदीर आढळून आला होता.