Pune News : उन्हाच्या कडाक्यात शितपेय पिण्याची इच्छा सर्वांनाच होते. मात्र, ते आरोग्यासाठी कितपत चांगलं असेल याची शंका उपस्थित होईल अशी एक घटना पुण्यातील जुन्नरमधून समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे असलेल्या एका ज्यूस सेंटरमध्ये (juice canter) वापरल्या जात असलेल्या बर्फाच्या लादीत चक्क एक मेलेला उंदीर(dead rat ) आढळला आहे. तो अक्षरश: बर्फामध्ये चारही बाजूनी अडकला होता. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या ज्यूस सेंटरला एक बर्फ(ice) विक्रेता बर्फ पूरवतो. त्याने न पाहता तशीच बर्फाची लादी त्या ज्यूस सेंटर चालकाला दिली होती. (हेही वाचा : Condoms Found In Samosas: पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीच्या कँटीनमध्ये समोस्यांमध्ये सापडले कंडोम, दगड, तंबाखू आणि गुटखा; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल)
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उसाचा रस, शीतपेय, बर्फाचा गोळा, अशा गोष्टींचा वापर करतात. मात्र नागरिकांना आता इथून पुढे थंड पदार्थांचे सेवन करतांना विचार करावा लगेल. या गोष्टी थंड ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळला आहे.
दरम्यान, या सर्व घटनेमुळे नागरिकांनी आपण खात किंवा पित असलेल्या सर्व गेष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. बर्फ बनविताना वापरलेले पाणी शुद्ध होते का? जर मेलेला उंदीर सापडा आहे तर, बर्फ साठविण्याची जागा चांगली आहे का? त्याठिकाणी मोकाट कुत्री, डुकरे यांचा वावर आहे का? लिंबू पाणी किंवा सरबत बनविणा-याच्या हाताला काही जखमा झालेल्या आहेत का? त्याचे हात स्वच्छ आहेत का? त्यापासून आपल्याला व बरोबर असणाऱ्या लहान बालकांना काही संसर्ग होईल का? यापैकी एकाही गोष्टींचा आपण विचार न करता डोळे झाकून समोर जे येईल ते पिऊन टाकता. जे आयोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे.