वृद्ध डॉक्टरला चोरांनी लावला 20 लाखाचा चुना
फोटो सौजन्य - गुगल

दिल्लीमध्ये एका वृद्ध डॉक्टरच्या घरात घुसुन काही अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी घरातील सर्व मंडळी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी या चोरांनी डॉक्टरच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

दिल्लीतल्या परमानंद कॉलनीत राहणारे डॉ. पी. के. बत्रा (65) असं या डॉक्टरांचे नाव आहे. सोमवारी रात्री ते आपल्या परिवारा सोबत एका कार्यक्रमासाठी गेले होते. मात्र रात्री 11.30 च्या दरम्याने ते कार्यक्रमावरुन एकटेच घराजवळ आले. त्याचवेळी घराजवळ उभ्या असलेल्या काही चोरांनी त्यांना पकडले. तर चोरांनी धमाकावत बन्ना यांच्या घरातील 20 लाख रुपयांपेक्षा जास्त सामान चोरुन पसार झाले आहेत.

या घडलेल्या प्रकाराची डॉ. बन्ना यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच या घटनेतील आरोपींनी पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर डॉ. बन्ना यांच्यावर चोरांनी चाकूने हल्ला केल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.