Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी नवी रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्ण अधिक आहेत. ही एक समाधानकारक बाब आहे. यातच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शहाजहानपूर (Shahjahanpur) येथून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. तिल्हार (Tilhar) भागातील कोरोनाबाधित महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिल्याची माहिती मिळत आहे. या माहितीनंतर गरोदरपणात कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलांना अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरलादेवी (वय, 30) असे संबंधित महिलेचे नाव आहे. ती तिल्हार परिसरातील रहिवाशी आहे. दरम्यान, या महिलेला प्रसूती कळा जाणवू लागल्याने तिला जवळील वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची नैसर्गिक प्रसूती झाली. महत्वाचे म्हणजे, ही महिला कोरोनाबाधित असतानाही तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या वैद्यकीय जनसंपर्क अधिकारी डॉ. पूजा त्रिपाठी यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Delhi: मोदीजी आमच्या मुलांची कोरोनाची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टरबाजी करणाऱ्या 15 जणांना अटक तर 17 लोकांच्या विरोधात FIR दाखल

भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 26 हजार 98 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 3 हजार 890 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 वर पोहचली आहे. यातील 2 लाख 66 हजार 207 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 53 हजार 299 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 36 लाखांवर गेली आहे.