India Coronavirus Cases: भारतातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वेगाला अद्यापही ब्रेक लागला नाही. गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोनाच्या घटनांमध्ये घट दिसून आली असली तरी अद्यापही ती देशासाठी आपत्ती ठरत आहे. देशात कोरोना विषाणूच्या मृत्यू तसेच मृत्यूच्या नव्या घटनांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात 3,82,315 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सोमवारीच्या तुलनेत जवळपास 28 हजार जास्त प्रकरण आढळून आली आहेत. भारतातील कोरोना रुग्ण संख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि अवघ्या 15 दिवसांत 50 लाखाहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात भारतात 3,82,315 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. 3,38,439 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, 3,780 जणांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली आणि ते कोरोना विषाणूचा बळी पडले. (वाचा - चिंताजनक! Hyderabad च्या प्राणीसंग्रहालयात चक्क 8 सिंहांना Covid-19 ची लागण, भारतामधील पहिलीच घटना- Reports)
India reports 3,82,315 new #COVID19 cases, 3,38,439 discharges and 3,780 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,06,65,148
Total recoveries: 1,69,51,731
Death toll: 2,26,188
Active cases: 34,87,229
Total vaccination: 16,04,94,188 pic.twitter.com/8ojDDAjfq7
— ANI (@ANI) May 5, 2021
दरम्यान, देशात सर्वांधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आढळून येत आहे. मंगळवारी राज्यात आज 51,880 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 65,934 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आणि त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 4107092 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 64,1910 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.16% झाले आहे.