कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित करुन घेतले आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात प्रत्येकजण लढा देत आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या लढाईत अनेकजण सरकारला पाठिंबा देत आहे. कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान अनेकजण सरकारला अर्थिक मदत करताना दिसत आहे. मध्य प्रदेश येथील एका 82 वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या पेन्शनच्या पैश्यामधून सरकारला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याबद्दल मध्यप्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी संबंधित महिलेचे आभार मानले आहेत. कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी अनेकजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देत आहेत. यात राजकीय नेते, कलाकार आणि सर्वसामान्य जनतेचाही समावेश आहे.

एका वृत्तपत्रात मदती संदर्भात वाचल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी सलभा उसकर यांनी आपल्या पेन्शन मिळणाऱ्या पैशातून एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सद्याची परिस्थिती पाहता मी मदत करण्याचे ठरविले. मी लोकांनी संचारबंदी आणि सरकारच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करते, असे जनसंपर्क विभागाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 82 वर्षांच्या सलभा उसकर यांनी म्हटले आहे. या 82 वर्षांच्या सलभा उसकर यांचा व्हिडिओ मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून ‘माँ तुझे सलाम’ असे लिहिले शेअर केला आहे. हे देखील वाचा- COVID-19: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

शिवराज सिंह यांचे ट्विट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 8 लाख 57 हजार वर पोहचली आहे. यांपैकी 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 78 हजार रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 637 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 133 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 321 वर पोहचली आहे. यात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.