Corona XE Variant in Gujarat: मुंबईनंतर आता गुजरातमध्ये आढळला कोरोनाच्या XE प्रकाराचा रुग्ण; अलर्ट जारी
Omicron | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Corona XE Variant in Gujarat: कोरोनाचा नवीन प्रकार XE ने गुजरातमध्ये दस्तक दिली आहे. तेथे या नवीन प्रकाराच्या पहिल्या केसची पुष्टी झाली आहे. यापूर्वी मायानगरी मुंबईतही या प्रकाराचे प्रकरण आढळून आले होते. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य मानला जात आहे, त्यामुळे सरकारही पूर्ण खबरदारी घेत आहे.

गुजरातमध्ये पुष्टी झालेल्या प्रकरणाबाबत असे सांगण्यात आले की, 13 मार्च रोजी ती व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळली. पण आठवडाभरानंतर त्यांची प्रकृती ठीक होती. परंतु जेव्हा नमुन्याचे निकाल आले तेव्हा ती व्यक्ती XE प्रकाराने संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. आता चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचा हा नवा प्रकार सर्वात संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे. XE प्रकार BA.2 प्रकारापेक्षा 10 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. (हेही वाचा - COVID 19 Booster Dose For Adults: 10 एप्रिल पासून सुरू होणारा Precaution Dose कोण, कधी, कसा घेऊ शकतात? किंमत किती? घ्या सारं जाणून)

प्राथमिक संशोधनानंतर असे सांगण्यात येत आहे की, XE प्रकार हे Omicron चा उप-प्रकार आहे. आतापर्यंत हा प्रकार अधिक धोकादायक सांगितले जात नसले तरी तो वेगाने पसरू शकतो. आतापर्यंत नोंदवलेल्या XE प्रकाराच्या दोन प्रकरणांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे सरकार आता घाबरू नका, असे आवाहन करत आहे.

जॉन्स हॉपकिन्स येथील गुप्ता-क्लिंस्की इंडिया इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या पॅनेल चर्चेत व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग म्हणाले, “लोक आता आंतरराष्ट्रीय प्रवास करत असल्यामुळे नवीन प्रकार येतील. आम्हाला XE प्रकाराबद्दल जेवढे माहित झाले आहे, ते चिंतेचे कारण नाही. आम्ही BA.2 बद्दल काळजीत होतो, पण BA.1 पेक्षा जास्त गंभीर नाही. XE प्रकार देखील BA.1 किंवा BA.2 (ओमिक्रॉनचे उप-वेरियंट) पेक्षा अधिक गंभीर रोग होत नाही.'

काही तज्ञांच्या मते, कोरोनाचे नवीन प्रकार देखील देशात नवीन लाट आणू शकतात. फरक एवढाच असू शकतो की, ते फारसे घातक ठरणार नाहीत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही. देशात कोरोनाची तिसरी लाट आली असतानाही परिस्थिती नियंत्रणात राहिली.