Supreme Court (Photo Credit - Twitter)

Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधी (Rajiv Gandhi) हत्याकांडातील दोषींच्या सुटकेवर काँग्रेस (Congress) ने आक्षेप घेतला असून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी हत्येतील दोषींना दोषमुक्त करण्याच्या आदेशाला आव्हान देणार असून याचिका दाखल करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केंद्राने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

राजीव गांधी हत्येप्रकरणी 1998 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने सर्व 26 आरोपींना दोषी ठरवले होते. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर अनेक दोषींची शिक्षा कमी करण्यात आली. काहींना सुटकाही मिळाली. आता या प्रकरणातील सहा दोषींचीही न्यायालयाने मुक्तता केली आहे. (हेही वाचा - Rajiv Gandhi Assassination Case: मी दहशतवादी नाही; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या Nalini Sriharan यांची पहिली प्रतिक्रिया)

राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे सभा होती. यादरम्यान आत्मघातकी स्फोटात त्यांना आपला जीव गमवावा लागला. या हत्येचा कट एलटीटीईशी संबंधित होता. 2000 मध्ये या प्रकरणात दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरनची शिक्षा फाशीवरून जन्मठेपेत बदलण्यात आली. यानंतर 2014 मध्ये अन्य सहा जणांच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले.

दरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरनसह 5 दोषींची तुरुंगातून सुटका केली होती. सुप्रीम कोर्टाने याआधीच आणखी एका दोषी पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते. दोषींच्या सुटकेचे आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, तामिळनाडू सरकारने यापूर्वी मारेकऱ्यांच्या सुटकेची शिफारस राज्यपालांकडे केली होती. या प्रकरणी राज्यपालांकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे आम्ही स्वत: निर्णय घेत आहोत.