हरियाणा येथील मानसेर येथे दोन संघातील क्रिकेटच्या सामन्या दरम्यान विरोधी संघ हरल्याने तरुणाने त्या संघाला चिडवले म्हणून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली आहे. तसेच मानसेर पोलिसांनी विरोधी संघातील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मानसेर येथील नाहपुर आणि नखडौल या दोन संघामध्ये क्रिकेटचा सामना ठेवण्यात आला होता. त्यावेळी नाहपुर या संघाने क्रिकेटचा सामना जिंकला. त्यावेळी जिंकलेल्या संघातील काही तरुणांनी विरोधी संघातील तरुणाला सामना हरल्यामुळे चिडवल्याच्या रागात त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेतील एका तरुणाला गोळी लागून तो जखमी झाला आहे. तर त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच नखडौलच्या संघातील तरुणालासुद्धा मारहाण करण्यात आल्याने तो सुद्धा गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन तरुणांची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.