Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दिले जाणाऱ्या जेवणात आढळलं झुरळ, रेल्वे प्रशासनाने मागितली माफी
Cockroach Found in Meal on Train: PC TW

Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणात मृत झुरळ सापडल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. वंदे भारत सारख्या एक्स्प्रेसट्रेनमध्ये ही घटना घडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एक्सच्या एका युजर्सनी या घटनेचा फोटो पोस्ट केला आहे. प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणाच्या पॅकेटमध्ये मृत झुरळ सापडले आहे. या आधी देखील अश्या अनेक घटना घडल्या आहे. (हेही वाचा- अहमदाबादच्या देवी डोसा पॅलेसमध्ये सांबरमध्ये आढळला मृत उंदीर, अन्न विभागाने रेस्टॉरंट केले सील)

मिळालेल्या माहितीनुसार,  १८ जून रोजी भोपाळहून आग्रा येथे प्रवास करणाऱ्या जोडप्यांनी जेवण मागवले होते त्यावेळी त्यांना डाळ आणि भात मागवले होते. डाळीत त्यांना मृत झुरळ आढळून आले. एक्सवर पोस्ट विधीत वार्ष्णेय असं नाव असलेल्या युजर्सनी हे पोस्ट केले आहे. विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने युजरच्या पोस्टला प्रतिसाद देत गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे. तसेच सेवा पुरवठादारांना योग्य दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 या घटनेनंतर रेल्वेत दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. नेटकऱ्यांनी पोस्ट पाहून संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी अनेकांनी मागणी केली आहे.