PM Modi Helps Tamil Nadu CM MK Stalin: पायऱ्या उतरताना मध्येच अडखळले मुख्यमंत्री एमके स्टॅलिन; पंतप्रधान मोदींनी दिला आधार, पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
CM MK Stalin, PM Modi (PC - Facebook)

PM Modi Helps Tamil Nadu CM MK Stalin: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी चेन्नईमध्ये 'खेलो इंडिया युथ गेम्स'चे (Khelo India Youth Games) उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM MK Stalin) ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासोबत सामील झाले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सीएम स्टॅलिन कार्यक्रमस्थळाकडे जात असताना थोडं अडखळतात. त्यानंतर पीएम मोदी त्यांचा हात धरून त्यांना आधार देतात.

या व्हिडिओमध्ये पीएम मोदी आणि सीएम स्टॅलिन एकत्र कार्यक्रमस्थळाकडे जाताना दिसत आहेत. यावेळी स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी हेही त्यांच्यासोबत होते. परंतु, यावेळी स्टॅलिन पायऱ्या उतरताना अचानक अडखळतात आणि त्यांचा थोडासा तोल जातो. मात्र, त्यानंतर पीएम मोदींनी लगेच हात पुढे करून स्टॅलिन यांना आधार देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा -Ram Jyoti on Jan 22: अयोद्धा राम मंदिर प्राण प्रतिष्ठा दिवशी संध्याकाळी 'राम ज्योती' प्रज्वलित करण्याचं PM Modi यांचे आवाहन)

दरम्यान, सीएम स्टॅलिनला आधार देत असलेल्या पीएम मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर काही वेळातच व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. (हेही वाचा - Kerala CM Pinarayi Vijayan Protest Jantar Mantar: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे जंतरमंतर येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन)

पहा व्हिडिओ - 

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'खेलो इंडिया' सारखे उपक्रम गरीब, आदिवासी आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांची स्वप्ने पूर्ण करत आहेत. 2029 युवा ऑलिम्पिक आणि 2036 ऑलिम्पिक खेळ भारतात आयोजित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.