22 जानेवारी दिवशी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाणार आहे. या दिवशी सार्याच रामभक्तांना अयोध्येमध्ये येणं शक्य नाही. त्यामुळे या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरी रामभक्तांनी संध्याकाळी 'राम ज्योती' प्रज्वलित करण्याचं आवाहन केले आहे. दुपारी 12.30 ते 1 दरम्यान मृगशीर्ष नक्षत्राच्या मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि 23 जानेवारीपासून हे मंदिर राम भक्तांना दर्शनासाठी खुलं असेल. Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नवी मुंबईचे कांबळे दाम्पत्य घेणार प्राणप्रतिष्ठेच्या पूजेत सहभाग!
पहा ट्वीट
PM Modi asks people to illuminate their homes with Ram Jyoti on January 22
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)