Arvind Kejriwal Lost Weight: अटक केल्यापासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वजन 8 किलोने घटले;  AAP ने व्यक्त केली चिंता
Arvind Kejriwal (PC - X/ANI)

Arvind Kejriwal Lost Weight: तिहार तुरुंगात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे वजन (Weight) सातत्याने कमी होत असल्याचा दावा आम आदमी पक्षाने (AAP) केला आहे. आपने शनिवारी दावा केला की, 21 मार्च रोजी अटक (Arrest) झाल्यापासून शनिवार 22 जूनपर्यंत मुख्यमंत्र्यांचे वजन 8 किलोने कमी झाले आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे. 21 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना अटक झाली तेव्हा त्यांचे वजन 70 किलो होते आणि तेव्हापासून त्यांचे वजन सातत्याने कमी होऊ लागले आहे. अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर ते 2 जून रोजी पुन्हा न्यायालयीन कोठडीत गेले तेव्हा त्याचे वजन 63.5 किलो इतके कमी झाले होते. आता शनिवारी मुख्यमंत्र्यांचे वजन आणखी कमी होऊन 62 किलो झाले आहे.

एम्सच्या वैद्यकीय मंडळाने मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कमी होत असलेले वजन लक्षात घेऊन त्यांच्या आहारात पराठा आणि पुरीचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने केजरीवाल यांच्या काही रक्त चाचण्या केल्या आहेत, त्यात म्हटले आहे की, हृदयविकार आणि कर्करोगाच्या चाचण्या अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. (हेही वाचा -Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामिनास स्थगिती; आपच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण)

आपने सांगितले की, मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केजरीवाल यांचे वजन कमी झाल्यामुळे त्यांच्यासाठी काही चाचण्यांची शिफारस केली होती, ज्यात हृदय आणि कर्करोगाचा समावेश आहे. AAP राष्ट्रीय संयोजकांनी चाचण्या घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत 2 जून नंतर आणखी एका आठवड्याने वाढवण्याची मागणी केली होती, असे पक्षाने सांगितले. (हेही वाचा - Delhi Court Grants Bail to Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा; दिल्ली न्यायालयाकडून दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना 21 दिवसांचा जामीन दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांनी आणखी काही दिवस जामीन वाढवण्यास नकार दिला होता.