Video Viral: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताजमहाल येथे सीआयएसएफ जवान आणि महिला पर्यटक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. या घटनेनंतर परिसरत खळबळ निर्माण झाली होती. सीआयएसएफ जवान ड्युटीवर होते त्यावेळीस एक महिला पर्यटक आणि तीच्या सोबत असलेल्या एका तरुणासोबत हाणामारी झाली होती. (हेही वाचा- रिक्षावर डान्स करणाना तोल गेला, नशीबाने थोडक्यात बचावला)
मिळालेल्या माहितीनुसार, ताज महाल येथे परिसरत एका सीआरएसएफ जवान आणि एका गटासोबत मारामारी झाली. या मारामारीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका तरुणी ताज महालच्या आवारात रील काढत होती. पंरतु तेथे उपस्थित असलेल्या सीआरएसएफ जवानेने रिल्स काढण्यास मनाई केली. मनाई केल्यानंतर तरुणीसोबत वाद झाला.
ताजमहल पर सीआईएसएफ की खुली गुंडागर्दी
ताज का दीरार करने आई महिला पर्यटक के साथ की मारपीट.
रील बनाने को लेकर हुआ था विवाद.
मारपीट का वीडियो सोशल मीडिया पर वायरल.@CISFHQrs @TajMahal pic.twitter.com/7K9blYZTnp
— Journalist Harikant sharma (@harikantsharmaG) April 6, 2024
वाद झाल्यानंतर जवान महिलेला धक्काबुक्की करताना आणि मारहाण करताना दिसत आहे, ज्यामुळे तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली. ती बदला घेण्याचा प्रयत्न करत असताना, एक माणूस तिला थांबवण्यासाठी हस्तक्षेप करतो. मात्र, जवानाने महिलेला थप्पड मारून तिच्यावर छत्रीने वार केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. उपस्थित पर्यटकांनी हा घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओला कंमेट केले आहे. व्हिडिओ संदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.