PM Narendra Modi's Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार 2 ग्रॅम सोन्याची अंगठी
PM Narendra Modi (PC - ANI)

PM Narendra Modi's Birthday: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (PM Narendra Modi's Birthday) 17 सप्टेंबर रोजी देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवण्यासाठी देशभरातील भाजप कार्यकर्ते (BJP Workers) विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. अशातचं आता पीएम मोदींचा वाढदिवस खूप खास आणि संस्मरणीय बनवण्यासाठी, तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भाजप तामिळनाडू युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेचं 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या बालकांना दोन ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 720 किलोग्रॅम मासे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच या दिवशी इतर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. (हेही वाचा - PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास 56 इंचाची थाळी, थाळी संपवणाऱ्यास आठ लाखांच्या बक्षीसासह केदारनाथची यात्रा)

मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी गुरुवारी सांगितले की, "चेन्नईमध्ये सरकारी RSRM हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्माला आलेल्या सर्व नवजात बालकांना 2 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी भेट दिली जाणार आहे. या अंगठीची किंमत 5 हजार रुपये असेल."

उपक्रमाच्या खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुरुगन म्हणाले, “मुलांना सुमारे 5000 हजार रुपयांची दोन ग्रॅमची अंगठी दिली जाईल. 17 सप्टेंबर रोजी या रुग्णालयात सुमारे 10-15 प्रसूती होण्याची शक्यता पक्षाने वर्तवली आहे. 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या मुलांचे स्वागत करून आम्ही आपल्या पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करत आहोत.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत बनवण्यात येणार खास थाळी -

दुसरीकडे, दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटच्या मालकानेही पीएम मोदींचा वाढदिवस खास बनवण्याचा निर्णय घेतला आहे. एआरडीओआर 2.0 रेस्टॉरंटच्या मालकाच्या मते, 17 सप्टेंबर रोजी एक विशेष थाळी सुरू करण्याची तयारी आहे. ते म्हणाले की, या प्लेटला '56 इंच मोदी जी' असे नाव देण्यात आले आहे. या थाळीत 56 प्रकारचे पदार्थ असतील. ग्राहकांना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पर्याय असतील.

रेस्टॉरंटचे मालक सुमित कलारा म्हणाले, 'मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे. ते आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याच्या वाढदिवशी आम्हाला काहीतरी अनोखी भेट द्यायची आहे. त्यामुळे आम्ही ही थाळी सुरू करण्याचे ठरवले आहे. आम्ही या थाळीला '56 इंच मोदी जी' असे नाव दिले आहे.