Zero Scrap Mission: मध्य रेल्वेची भंगारातून 391.43 कोटींची कमाई
Railway Scrap (Photo Credit: Twitter)

कोरोना महामारीपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक जवळपास ठप्प असल्यात जमा आहे. यामुळे रेल्वेला प्रवासी वाहतुकीसाठी मिळणारे मोठ उत्पन्न बुडाले आहे. मात्र, मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) 'झिरो स्क्रॅप मिशन' (Zero Scrap Mission) सुरू केले आहे. यातून मध्य रेल्वेने 2020-21 या वर्षात 391 कोटी रुपयांचे भंगार विकले आहे. मध्य रेल्वेने गेल्या 15 वर्षात भंगार विक्रीतून मिळवलेली सर्वात मोठी कमाई आहे.

या स्क्रॅप मटेरियलमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे साहित्य, निरूपयोगी डबे, वॅगन आणि इंजीन इत्यादींचा समावेश आहे. मध्य रेल्वेने 8.65 कोटी रुपयांच्या कमाईसह ई -ऑक्शनद्वारे "जसे आहे तिथे आहे" तत्वावर वापरात नसलेल्या संरचनांची विल्हेवाट लावली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही तर यामुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. ते म्हणाले की, रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल. हे देखील वाचा- IRCTC कडून महिला ट्रेन यात्रींसाठी रक्षाबंधन सणाचं गिफ्ट; Tejas Express ने प्रवास करणार्‍यांना स्पेशल कॅशबॅक ऑफर

या आर्थिक वर्षात, रेल्वे लाभार्थ्यांच्या उपचार/काळजीसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, ऑक्सिजन जनरेटर प्लांटसह कोविड वस्तूंच्या खरेदीची व्यवस्था करण्याबरोबरच रेल्वे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यात साहित्य व्यवस्थापन शाखेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.